गडहिंग्लज : दि.९ एप्रिल रोजी साई इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. तसेच पारंपारिक पद्धतीने गुढी उभारून शिक्षणाचा व साक्षरतेचा संदेश देण्यात आला. याकरिता विद्यार्थ्यांना पारंपारिक वेशभूषेमध्ये कार्यक्रमास बोलवण्यात आले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्याथ्यांसोबत आलेले पालक यांच्या हस्ते ही गुढीची पूजा करण्यात आली.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. सतीश पाटील सर, पालक वर्ग, विदयार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. सुजाता नागराळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.