शिवराज महाविद्यालयात कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांची जयंती साजरी

KolhapurLive
 गडहिंग्लज :  येथील शिवराज महाविद्यालयात कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले. या कार्यक्रमात कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे व उपाध्यक्ष श्री जे.वाय.बारदेस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आदर्शवत कार्याची ओळख नव्या पिढीने करून घेणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा आदर्श घेऊन आपली वाटचाल करणे गरजेचे आहे. कर्मवीरांनी आपल्या त्यागी कार्यातून समाजाला बहुमोल असे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण सर्वांनी करावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमात शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नांवाने सुरु करण्यात आलेले आमची शिक्षण संस्था या भागातील विद्यार्थ्यांच्या हित जपण्याबरोबरच सामाजिक कार्यात नेहमीच योगदान देत आहे. असे स्पष्ट करून दरवर्षी आमच्या संस्थेच्यावतीने यावर्षीपासून २ जानेवारीला ‘राज्यस्तरीय कर्मवीर सामाजीक पुरस्कार’देण्यात येणार आहे. कर्मवीरांच्या विचारांचा जागर करण्यासाठी वर्षभरात १२ व्याख्याने तसेच पत्रव्यवहारामार्फत कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य-कर्तृत्व विस्तारण्याचे कार्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाचनकट्टा कोल्हापूरच्या संचालिका सौ.वनिता कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, विना-अनुदानित विभागाचे अॅकेडेमिक डायरेक्टर डॉ.आर.एस.निळपणकर, फार्मसीचे प्राचार्य डॉ.राहुल जाधव, प्रा.आझाद पटेल यांच्यासह प्राध्यापक प्रशासकीय सेवक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. संचालिका प्राध्यापिका सौ बीनादेवी कुराडे यांनी सर्वांचे आभार मानले.