उत्तुर, दि. २२:उत्तूर येथील कु. वृषाली संतराम कांबळे
हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ३१० रॅक मिळवीत घवघवीत यश मिळवले. तिच्या यशाबद्दल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तिचा उत्तुरमध्ये सत्कार झाला. कु. वृषालीचे कौतुक करताना पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, उत्तूरच्या कु. वृषाली कांबळे हीचे यश गौरवस्पद आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही अपार परिश्रमातून तिला घडविणाऱ्या तिच्या आई-वडिलांना माझा अंतकरणापासून सलाम, असेही ते म्हणाले.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कु. वृषालीचे हे यश गावासह कोल्हापूर जिल्ह्याला भूषणावह आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा. शिक्षणाला पर्याय नाही, हा मूलमंत्र दिला होता. वृषालीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ही शिकवण सार्थ करून दाखविली. तिला लागेल तिथे सहकार्य करू.
राजर्षी शाहू महाराज असते तर.........!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना गोरगरिबांच्या शिक्षणाबद्दल अत्यंत तळमळ होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून कु. वृषाली संतराम कांबळे हिने हे घवघवीत यश मिळविले आहे. आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज हयात असते तर त्यांनी वृषालीची कोल्हापुरात मिरवणूक काढली असती.....!
यावेळी वडील संतराम कांबळे, आई सौ. संगीता संतराम कांबळे, चुलते दौलती कांबळे व बळीराम कांबळे, माजी शिक्षण सहसंचालक मकरंद गोंधळी, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, शिरीष देसाई, गणपतराव सांगले, मारूती घोरपडे , व्ही. एस. कांबळे, सरपंच किरण आमनगी, उपसरपंच समिक्षा देसाई सर्व ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कामत , विश्वजीत कांबळे, गिरीष ऐवाळे, सुधीर सावंत, विजय गुरव व ग्रामस्थ उपस्थीत होते.
उत्तूर ता. आजरा येथील कु. वृषाली संतराम कांबळे हिने आयएएस परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल तिचा सत्कार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रताप उर्फ भैया माने, वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, विजय गुरव, सुधीर सावंत आदी प्रमुख.