नेत्रदानाने गाठले शतक

KolhapurLive

_अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील *निवृत्ती कृष्णा मोहिते यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले.* अत्याळमधील हे ३४ वे तर चळवळीतील १०० वे नेत्रदान आहे._ 

२९ आॅक्टोबर २०१२ रोजी मरणोत्तर नेत्रदान चळवळीची सुरुवात झाली. गेल्या साडेअकरा वर्षांत चळवळीत झालेल्या नेत्रदानाने आज शतकी टप्पा गाठला. कोणाचाही मृत्यू हा दुर्दैवीच. त्याला थांबवणे आपल्या हातात नाही. पण, मृत्यूपश्चात नेत्रदानातून अंधांना दृष्टी देण्याचे महान काम या लोकांनी केले आहे. 

अत्याळ, बेळगुंदी, ऐनापूर, कौलगे, गडहिंग्लज शहर, सरोळी, करंबळी, भडगाव, नूल, शिप्पूर तर्फ आजरा, उत्तूर, शेंडूर, बामणे, उंबरवाडी, हिरलगे, लिंगनूर कसबा नूल, बामणे, इंचनाळ, गिजवणे, कडगाव, हंदेवाडी या गावातील व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे.