गडहिंग्लज :येथील शिवराज महाविद्यालयाच्या बी.सी.ए., बी.सी.एस. व बी.एस्सी.कॉम्प्युटर सायन्स विभागाचे बारा विद्यार्थी पुणे येथील ‘एक्सेल आर इडीटेक प्रा.लि.पुणे’ या मल्टीनॅशनल कंपनीसाठी ‘सॉफ्टवेअर इंजिनिअर’ या पदावर कँपस इंटरव्ह्यूमधून निवड झाली.
या निवडीमध्ये प्राजक्ता प्रशांत भोगण, प्रथमेश विनायक पोटेकर, सायली मारुती पाटील, ऋतुजा विकास पाटील, ऋषिकेश आनंदा कोरे, वेदिका ईश्वर गुंजकर, ऋतुजा रावजी देसाई, प्रतिक तानाजी भोसले, सानिका सखाराम घमे, स्नेहा नेताजी होडगे, प्रथमेश विजय चव्हाण, खुशबू राशीद ताशीलदार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या निवडीबद्दल महाविद्यालयाच्यावतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, विना-अनुदानित विभागाचे अॅकेडेमिक डायरेक्टर डॉ.आर.एस.निळपणकर, प्रा.आझाद पटेल यांचे प्रोत्साहन तर अॅकेडेमिक प्रमुख प्रा.के.एस.देसाई, बी.बी.ए. विभाग प्रमुख प्रा.आर.डी.कमते, बी.सी.एस.विभाग प्रमुख प्रा.रवी खोत, बी.एस्सी.कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्रा. आर.के.पाटील, बी.एस्सी.अॅनिमेशन विभाग प्रमुख प्रा.बी.एस.पठाण. प्लेसमेंट सेल विभाग प्रमुख प्रा.एन.जी.चव्हाण, प्रा.विक्रम शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.