चंदगड : हलकर्णी येथील अथर्व-दौलत कारखान्याचा चालू गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरू असून कारखान्याचे आजतागायत १ लाख ८० हजार मे. टनाचे गाळप पूर्ण झाले आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे अथर्व-दौलत कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बीले वेळेत अदा करण्याची परंपरा कायम ठेवली असून दि. १ ते १५ डिसेंबर २०२३ या पंधरवड्याची ऊस बीले ३१०० रूपये प्रति टन प्रमाणे रक्कम २० कोटी ६९ लाख ९८ हजार १६९ रूपये कारखान्याने संबंधीत ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली.
यावर्षीच्या गळीत हंगाम उत्तमरित्या सुरू असून त्यासाठी अथर्व-दौलत कारखान्याने योग्य नियोजन केले असल्याने सध्या कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखान्याला यावा, यासाठी शेती विभागामार्फत तोडणी व ओढणी यंत्रणेचे चांगल्या पध्दतीने नियोजन करून कार्यक्षेत्रातील ऊस शेतकऱ्यांना उत्पादक प्रथम प्राधान्य दिले जात आहे. त्याचप्रमाणे कारखान्यात निघणाऱ्या प्रेसमडवर उत्तमरित्या प्रक्रिया करून उत्कृष्ठ आणि उच्च प्रतीचे कंपोष्ट खताची निर्मिती करत असून ते माफक दरात शेतकऱ्यांना उपलब्ध असून याचा जास्तीत जास्त सर्व घटकाच्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात आले.
यावेळी पृथ्वीराज खोराटे, संचालक विजय पाटील, युनिट हेड मेहश कोनापुरे यांचेसह कारखान्याचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते