गडहिंग्लज : रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीला नव्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रात ७ शाखा काढण्यासाठी केंद्रीय निबंधकांनी मंजुरी दिली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी ही माहिती दिली.
रवळनाथ सोसायटीच्या ११ शाखा असून त्यातील ७ शाखा स्वमालकीच्या इमारतीत आहेत. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे आणि बेळगाव जिल्ह्यात या शाखा कार्यरत आहेत. नव्याने ७ शाखा मंजूर झाल्या असून यामध्ये महाराष्ट्रातील पंढरपूर, सांगोला, तासगाव, बांदा, नवी मुंबई याचबरोबर कर्नाटकातील धारवाड आणि चिकोडी या समावेश आहे संस्थेकडे १२ हजार सभासद असून ४१५ कोटीच्या ठेवी आहेत
कोटीच्या ठेवी आहेत. आतापर्यंत ४ हजार घरांना ३०० कोटीचे कर्ज वितरण केली आहे.
प्लॉट खरेदी, घरबांधणी, प्लॅट यासाठी ९० लाखांपर्यंत तर ५० लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज दिले जात आहे. संस्थेकडे २६ कोटी ५३ लाखांचे स्वनिधी असून ग्राहकांसाठी अद्ययावत सुविधा देण्यात आल्या आहेत. नव्या शाखा मंजुरीसाठी संस्थेचे उपाध्यक्ष, संचालक, सीईओ यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे श्री. चौगुले यांनी सांगितले.