दि. 13 ते 17 नोव्हेंबर 2023 या दरम्यान होणाऱ्या " गोल्स फॉर गर्ल्स" यांच्या "नेतृत्व कौशल्ये विकास" प्रोग्रॅममध्ये एटी फाऊंडेशनची निवड झालेली आहे. "गोल्स फॉर गर्ल्स" ही एक अमेरिकन संस्था असून दरवर्षी भारतामध्ये मुलींसाठी विविध प्रोग्रॅम राबविते. यावर्षीच्या त्यांच्या प्रोग्रॅममध्ये भारतातून केवळ १७ संस्थांना सहभागी होण्याची संधी देण्यात आलेली आहे. यामध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव एटी फाऊंडेशनची निवड करण्यात आली आहे.
एटी फाऊंडेशन ही गेले 1 वर्षापासून कोल्हापूर, गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड भागात मुलामुलींना नेतृत्व आणि फुटबॉल कौशल्ये शिकविण्यासाठी सक्रिय आहे. ही संस्था माजी फुटबॉल खेळाडू, एएफसी 'ए' परवानाधारक प्रशिक्षिका, एएफसी पॅनल सदस्या आणि तांत्रिक तज्ञ अंजू तुरंबेकर यांनी स्थापित केलेली आहे.
गडहिंग्लज आणि आजरा भागातील वेगवेगळ्या गावातील ८ मुली आणि 2 प्रशिक्षक एटी फाऊंडेशनचे प्रनिनिधित्व करणार आहेत. एटी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या "नेतृत्व कौशल्ये विकास" मधील जवळजवळ 800 सहभागी मुलींमधून यांची निवड करण्यात आली आहे. हा प्रोग्राम दि. 13 ते 17 नोव्हेंबर 2023 दरम्यान मुंबई येथे होणार आहे. यासाठी एटी फाऊंडेशनचा संघ कोल्हापूर येथून 12 नोव्हेंबर रोजी रवाना होणार आहे.
दि. 11/11/2023 रोजी या टीमला गावचे सरपंच, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि खेळाडूंच्या उपस्थितीत एटी फाऊंडेशनने फुटबॉल प्लस अकॅडमी, स्पेन आणि भारत यांच्या साहाय्याने कीट देऊन अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी गडहिंग्लज हायस्कूल गडहिंग्लजचे मुख्याध्यापक श्री. पंडित पाटील, श्री. रामचंद्र शिंदे - मुख्याध्यापक रामलिंग हायस्कूल नूल, श्री. अमनगी - मुख्याध्यापक उत्तूर विद्यालय उत्तूर, श्री. अनिल पाटील - एटी फाऊंडेशन, मार्गदर्शक, श्री. प्रशांत शिंदे - सरपंच महागाव, सौ. रुपाली पाटील - सरपंच अर्दाळ, सौ. रेखा पोतदार - समाजसेविका गडहिंग्लज उपस्थित होते.
एटी फाऊंडेशनचा संघ खालीलप्रमाणे
1. कस्तुरी शशिकांत कदम (कॅप्टन) - उत्तूर विद्यालय, उत्तूर
2.शरयू संतोष धूरे (कॅप्टन) - उत्तूर विद्यालय, उत्तूर
3.शीतल चिगरी - दुरदुंडेश्वर हायस्कूल, मुत्नाळ
4.प्रांजल गेंगे - अप्पासाहेब गायकवाड हायस्कूल, महागोंड
5. अंजली रवळू कांबळे - रामलिंग हायस्कूल, नूल
6.अथर्वी अर्जुन दिवटे - महात्मा फुले विद्यालय, महागाव
7.हर्षिता उत्तम चव्हाण - माध्यमिक विद्यालय, अर्दाळ
8.धनश्री अनिल गवळी - गडहिंग्लज हायस्कूल, गडहिंग्लज
9. भक्ती पवार - मुख्य प्रशिक्षका
10. आकाश देसाई - साहाय्यक प्रशिक्षक