शिवाजी विद्यापीठ विभागीय अॅथलेटिक्स स्पर्धेत शिवराज महाविद्यालय जनरल चैंपियनशिपचा दहाव्यांदा विजेता

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पार पडलेल्या शिवाजी विद्यापीठ विभागीय अथलेटिक्स स्पर्धेत असल चैंपियनशिप दहाव्यांदा पटकावले. महाविद्यालयाच्या खेळाडूंनी अॅथलेटिक्स स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावून महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेचा अभिमान सार्थ ठरविला.

या दैदिप्यमान यशाबद्दल महाविद्यालयाच्यावतीने सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. या अथलेटिक्स स्पर्धेत यशस्वी झालेले महाविद्यालयाचे खेळाडू असे प्रफुल्ल थोरात थाळीफेक, गोळाफेक प्रथम, महादेव चौगुले बाबू प्रथम, मयुरी आहे. बांबूडी प्रथम, उंचउडी व्दितीय ऋषिकेश काटे. उंचउडी, लांबउडी तृतीय, धैर्यशील गायकवाड उंचउडी प्रथम, आश्लेषा मांगले. धावणे. आठशे मीटर प्रथम, पंधराशे मीटर व्दितीय, ४५४०० मीटर रिले प्रथम मी मिक्स रिले तृतीय, खुशी रेडेकर- पाच हजार मीटर धावणे प्रथम, अपूर्व पाटील भालाफेक प्रथम, सानिका गुजर-लांबउडी व्दितीय २x४०० मीटर रिले प्रथम व २x१०० मीटर रिले व्दितीय, देवयानी चौगुले- पावणेदोनशे मीटर तृतीय xx४०० मीटर रिले प्रथम व ४१०० मीटर रिले व्दितीय, दिपाली पाटील- ४४०० मीटर दिले प्रथम व x १०० मीटर रिले व्दितीय सीमा नांदुरकर- ४५४०० मीटर मिक्स रिले तृतीय, रोहन केसरकर, विशाल ० मीटर मिक्स रिले तृतीय, प्रभंजन खेडेकर. बाजीफेक-तृतीय, पुष्पक खबरे, युवराज वाळसे, आरती पोवार, नविनी मोकाशी, सानिका पाटील, तेजस पाटील, चैतन्य माने, युवराज बाबर, संकेत बरकाजे, ओंकार चोथे व रोहन चौगुले आदी खेळाडूंनी ही चैंपियनशिप पटकाविण्यासाठी विशेष योगदान दिले,

या सर्व खेळाडूंना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष अँड. दिग्विजय कुरादे प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक डॉ. राहुल मगदूम व प्रा. जयवंत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.