गडहिंग्लज : शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे आणि कोल्हापूर येथील उद्योगपती बसवेश्वर आजरी यांना अविष्कार फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत सपत्नीक आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सोमवार दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुबई येथे देशातील आणि देशाबाहेरील निवडक भारतीयांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील 25 व्यक्तींना असे सहकुटुंब पुरस्कार वितरित केले जात आहेत. या संदर्भात शिवराज विद्यासंकुलाकडून अशी विनंती करण्यात येत आहे की, आपल्या परिसरातून आणि विशेषतः शिवराज विद्यासंकुलातून आणि महाराष्ट्रातून ज्या व्यक्ती दुबईमध्ये कार्यरत झालेल्या आहेत. त्यांनी या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी फोनवरून संपर्क साधावा तसेच ९८८१४४५४९१ ९८२२६७५७५०, १०९६७२६३३७ या तीन मोबाईल नंबरवर आपले नातेवाईक, मित्रपरिवार बांचा फोन नंबर कळवावा जेणेकरून त्यांच्याशी आम्हालाही संपर्क साधणे शक्य अशी विनंती शिवराज विद्या संकुलाच्यावतीने करण्यात आली आहे.