राजा गडहिंग्लजचा श्री हाळलक्ष्मी गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी श्री अरुण शिंदे तर उपाध्यक्षपदी युवराज आडावकर यांची निवड

KolhapurLive

दिनांक 14-9- 2023 रोजी संस्थापक अध्यक्ष श्री संजू उर्फ संदीप रोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत श्री हाळलक्ष्मी गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी श्री अरुण शिंदे सरकार तर उपाध्यक्षपदी युवराज आडावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच खजिनदारपदी श्री विशाल रोटे व सचिव पदी श्री अवधूत रोटे यांची निवड करण्यात आली तसेच सदर मिटिंग मध्ये वार्षिक देखावा संबंधित निर्णायक चर्चा झाली या मीटिंग करिता मंडळाचे सोहेल नदाफ ,धनराज रोटे साहिल कुंभार ,अभिषेक रोटे अनिकेत रोटे, मानव रोटे राहुल मोरे ,संतोष जाधव, प्रवीण शिंदे, स्वप्निल देशपांडे सुरज कावळे ,श्री पोवळ राहुल रोटे व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते