गडहिंग्लज: येथील शिवराज महाविद्यालयात कला शाखेच्या नवागत विद्यार्थ्याचा स्वागत समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते तर प्रमुख अतिथी म्हणून मी डायरेक्टर डीआरएम यांची उपस्थिती लाभली प्रारंभी स्वागत प्रास्ताविक डॉ. एस.बी.माने यांनी केले. अतिथींचा परिचय डी. ए. के. मोरमारे यांनी करून दिला. या कार्यक्रमात डॉ. आर. एस. यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी कलात्मक जीवन जगले पाहिजे. आपल्यातील कलांना वाव देण्याचा प्रयत्न केल्यास महाविद्यालयीन काळातच आपल्यातील खऱ्या कलेला व्यासपीठ प्राप्त होईल. आपल्यातील कलेला वेळीच जाणले पाहिजे तरच आपली क्षमता सिद्ध करता येते. स्वतःला झोकून देऊन काम केले पाहिजे आणि मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनीही अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अँड. दिविनय कुराडे, प्रा.सौ. बिनादेवी कुराडे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज, प्रा.विशांत दानवडे यांनीही विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. दुर्वाकुर डोमणे, परशराम हेवी, रविना करमे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री पुंडलिक मगदूम, डॉ. एन. आर. कोल्हापुरे, डॉ. मनमोहन राजे, डी.जी. जी. गायकवाड, डी.एन.बी.ईबीले, डॉ. एस. डी. सावंत, डॉ.ए. बी. कुंभार, डी.ए. जी. हारदारे, डॉ.आर.पी. हेडगे, प्रा. डी. यु.जाधव, प्रा.शरद पाटील, डॉ. वृषाली हेरेकर, प्रा. पौर्णिमा कुराडे, डॉ. श्रद्धा पाटील, प्रा. लोहिता माने यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निमेश देवार्डे, अवनी साळोखे यांनी केले तर आभार पौर्णिमा कुंभार यांनी मानले,