गडहिंग्लज : कोल्हापुर जिल्हा भाजपच्या पदाधिकारी पदी निवड झालेबद्दल भाजप गडहिंग्लज तालुका व शहर यांचे वतीने या नुतन पदाधिकारी यांचा सत्कार करणेत आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजे बँक संचालक श्री. रविंद्र घोरपडे यांनी भुषवले. सुदर्शन चव्हाण यांनी सर्वाचे स्वागत केले.
याप्रसंगी नवनिर्वाचीत पदाधिकारी राजेंद्र तारळे (जिल्हा उपाध्यक्ष), अनिता चौगुले (जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष) वैशालीताई नाईकवडे (इचलकरंजी जिल्हा उपाध्यक्ष संतोष तेली (गडहिंग्लज पूर्व चंदगड विधानसभा), प्रितम कापसे (गडहिंग्लज पश्चिम कागल विधानसभा) यांची निवड झाली. त्याबद्दल सर्वांनी आपले मनोगते व्यक्त केली. त्याचबरोबर सर्व नुतन पदाधिकारी यांचा सत्कार राजे बँक संचालक रविंद्र घोरपडे यांचे हस्ते, शैलेंद्र कावणेकर व अनिल गायकवाड यांचे हस्ते सत्कार करणेत आला. अध्यक्षीय भाषणात रविंद्र घोरपडे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या तर आभार प्रताप मोहिते यांनी मांडले.
कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थीत होते.
मनिष पटेल, बाजीराव खोत, विश्वजीत पोवार, अमर पोटे, वरुण गोसावी, योगेश येजरे, सुरज पोवार, रमेश इंजल, आशिष बेगडा, ओमकार पोवार, किरण बुध, किशोर कदम, अभि भोई, ओमकार ठोंबरे, इराणा देसाई, विनायक -हाटवळ, आर्यन 'सुतार, अमन दळवी आदी उपस्थित होते.