शालेय खो-खो स्पर्धेमध्ये संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजच्या मुलांचा व मुलींचा संघ विजेता

KolhapurLive

गडहिंग्लज : 19 वर्षाखालील तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेमध्ये संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजच्या मुलांचा व मुलींचा संघ विजेता ठरला. या दोन्ही संघांनी अत्यंत चुरशीने झालेल्या या दोन्ही सामन्यात प्रतिस्पर्धी जागृती ज्युनिअर कॉलेजच्या दोन्ही संघांचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकाविला. महाविद्यालयाच्या आशिष गायकवाड, विनीत पाटील, आरती पाटील, गायत्री कोणकेरी, विरजा चौगुले या खेळाडूंनी उत्कृष्ठ कामगिरी बजावली. महाविद्यालयाच्यावतीने या दोन्ही संघांच्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

विजेता मुलींचा संघ - ऐश्वर्या कोणकेरी, पल्लवी गुरव, अमृता मोकाशी, आरती पाटील, गायत्री कोणकेरी, मेघना मोहिते, रसिका शिंत्रे, समीक्षा पाटील, सलोनी केसरकर, स्वाती देसाई, विरजा चौगुले, श्रद्धा शिंदे, प्रतीक्षा जाधव, ऋतुजा पाटील, साक्षी केसरकर

विजेता मुलांचा संघ अथर्व कोलते, आर्यन देसाई, आशिष गायकवाड, प्रकाश पोवार, प्रणव गुरव, प्रमोद पाटील, विनीत पाटील, विग्नेश मगदूम, शिरीष सुतार, शुभम देसाई, संदेश गाडे, सार्थक सावंत, साहिल कालागते, सौरभ शेवाळे या सर्व विजेत्या खेळाडूंना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांचे प्रोत्साहन तर पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, क्रीडा शिक्षक प्रा.जयवंत पाटील, डॉ. राहुल मगदूम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.