दि. १२ ऑगस्ट हा जगभरात आंतरराष्ट्रीय युथ डे म्हणून साजरा केला जातो. एटी फाऊंडेशन आणि अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी तर्फे उत्तूर विद्यालय आणि ज्यु. काॅलेज, उत्तूर मध्ये हा दिवस साजरा करण्यात आला.
भरघोस उत्साहात पार पडलेल्या या प्रोग्रॅममध्ये तब्बल 60 मुलामुलींनी सहभाग नोंदविला. यावेळी मुला-मुलींना प्रश्नोत्तरे द्वारे तरुणांचे सामाजिक विकासामध्ये असणारे महत्व समजावून सांगण्यात आले.
माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू, अकॅडमी आणि फाऊंडेशनच्या संस्थापिका, कु.अंजू तुरंबेकर यांनी खेडेगावात राहून प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत आपले आयुष्य कसे घडविले याची माहिती फाऊंडेशनच्या मुख्य कु. भक्ती पवार यांनी सांगितली. याचवेळी अंजू तुरंबेकर यांनी ऑनलाइन पद्धतीने मुलामुलींशी संवाद साधताना त्यांना ध्येय निश्चित करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि त्या ध्येयपूर्ती साठी एटी फाऊंडेशन तर्फे सतत मार्गदर्शन देण्याची तयारी दर्शवली. तसेच उत्तूर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शैलेन्द्र अमनगी यांनी तरुण मुलामुलींनी अंजू तुरंबेकर यांच्यासारख्या व्यक्तींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवले तर आपली तरुण पिढी कर्तृत्वान बनेल असे व्यक्त केले.
सदर प्रोग्रॅम अंजू तुरंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. एटी फाऊंडेशनच्या मुख्य भक्ती पवार, अकॅडमीचे कोच आकाश देसाई, फाऊंडेशनचे स्वयंसेवक आकांक्षा माळगी, मयुरी अर्जुनवाडे , तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. शैलेन्द्र अमनगी, प्राध्यापक श्री. ईश्वर शिवणे, श्री. दत्तात्रय मुदाळकर, श्री. किरण मस्कर, श्रीमती. माधुरी सावरकर आणि सर्व शिक्षक वर्ग यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले.