भाजपा नेत्या पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. यासंदर्भात अनेक तर्क-वितर्कही लावले जात होते. पंकजा मुंडेंनी राहुल गांधींची भेट घेतल्याचेही दावे केले जात होते. मात्र, आज पंकजा मुंडेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते सर्व दावे खोटे असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. आपण पक्ष सोडत नसल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतच्या चर्चा तूर्तास थांबल्या असल्या, तरी या स्पष्टीकरणासोबतच पंकजा मुंडेंनी आपण दोन महिन्यांचा ब्रेक घेणार असल्याची मोठी घोषणा यावेळी केली.
एखाद्या घटनेविषयीची माहिती एखाद्या समाजाच्या जबाबदार नेत्याकडे आहे आणि तो म्हणतो की मी थोड्या थोड्या वेळाने देतो, तर हा जनतेचा अधिकारभंग नाही का?” असा सवाल यावेळी पंकजा मुंडेंनी केला. “एखाद्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडे जर एखादी माहिती असेल, तर तिचा राजकीय फायदा घेण्यापेक्षा त्या माहितीचा न्यायासाठी उपयोग करून शिक्षा दिली पाहिजे अशी माझी भूमिका आहे”, असंही त्या म्हणाल्या