लायन्स क्लब, गडहिंग्लजचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

KolhapurLive

गडहिंग्लज : लायन्स क्लब गडहिंग्लजचा नुतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँक येथील रविंद्र देशपांडे स्मृती सभागृहात संपन्न उत्साह व हर्ष वातावरणात संपन्न झाला.
        माजी प्रांतपाल एमजेएफ ला. जगदीशजी पुरोहित त्यांनी लायन्स क्लबच्यानूतन अध्यक्षा ला. सौ. दिपाली पट्टणशेट्टी, सचिव ला.सविता वडगुले, खजिनदार सौ. उज्वला मार्तंड यांच्यासह क्लबच्या संचालक मंडळास क्लबच्या सेवा व प्रशासकीय कार्याची जबाबदारी व पदाची शपथ दिली. याकार्यक्रमास माजी प्रांतपाल एमजेएफ ला.आण्णासाहेब गळतगे याची प्रमुख उपस्थिती होती.
      यावेळी गडहिंग्लज नगरीत प्रवेश करीत असलेल्या काळभैरी रोड आणि भडगांव रोडवरती लायन्स क्लब मार्फत उभारण्यात आलेल्या स्वागत बोर्ड उदघाटन तसेच सभासदाच्या गुणवंत पाल्याचा सत्कार प्रमुख अतिथीच्या हस्ते संपन्न झाला.
          माजी प्रांतपाल ला. आण्णासाहेब गळतगे , ला. प्रकाश शहा, नुतन अध्यक्षा ला.सौ.दिपाली पट्टणशेट्टी यांनी आपली मनोगते व्यक्त केली 
या कार्यक्रमास ला.डॉ. सुभाष पाटील, ला.डॉ. सीमा पाटणे, ला.राजशेखर दड्डी, ला.प्रसाद सभासद, ला.अशोक देशपांडे, ला.गुरूराज हत्ती , ला. सुनिल पट्टणशेट्टी, ला.गौरव देशपांडे, ला.सौ.उषा दड्डी, सौ अनुराधा गळतगे यांच्यासह सर्व लायन्स परीवारातील सदस्य उपस्थित होते.
ला.एमजेएफ विनायक गळतगे यांनी स्वागत केले ला. राजेंद्र वडगुडे यांनी सूत्रसंचालन केले.तर ला. प्रतिक पाटील यांनी आभार मानले.