गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात क्रीडा व एन.सी.सी. विभाग व गांधी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. आजरा साखर कारखान्याचे चेअरमन प्रा.सुनील शिंत्रे, प्राचार्य कल्याणराव पुजारी, शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अँड. दिग्विजय कुराडे, संचालक श्री बसवराज आजरी, श्री अशोक पट्टणशेट्टी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी स्वागत प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी केले. यावेळी गांधी विचार मंचचे श्री आप्पासाहेब कमलाकर, श्री रवींद्र दावणे, नॅक समन्वयक प्रा. किशोर अदाटे क्रीडा व एन.सी.सी. विभाग डॉ. राहुल मगदूम, प्रा.जयवंत पाटील यांच्यासह एन.सी.सी. चे कॅडेट व खेळाडू उपस्थित होते. वन विभागाचे अधिकारी श्री डी.बी. काटकर यांच्या विशेष सहकार्याने महाविद्यालयास रोपे प्राप्त झाली आहेत. महाविद्यालयाच्या मैदान परिसरात बेल, करंज, आंबा, जांभूळ, फणस यांसह तीस रोपांचे वृक्षारोपण करण्यात आली आहेत.