गडहिंग्लज : जागृती हायस्कूलमध्ये उत्साही वातावरण चिखल महोत्सव पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी चिखलात लंगडी,झुकझुक गाडी, टांगा घोडा, आंधळी कोशिंबीर, झिम्मा फुगडी, रस्सीखेच, खो-खो, कुस्ती, व्हॉलीबॉल, फुटबॉल आदी खेळ करत आनंद लुटला. मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. शिवाजी अनावरे, अनिल मसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रिडा शिक्षक संपत सावंत, प्रकाश हारकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव पार पडला.