गडहिंग्लज : कारगिल विजय दिनानिमित्त येथील आजी-माजी सैनिक तालुका वेल्फेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाऊंडेशन, गडहिंग्लज नगरपरिषद, कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. बुधवारी (दि. २६) सकाळी १० ते ४ या वेळेत भडगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईवरील कला अकादमीमध्ये हे शिबिर होणार आहे. प्रारंभी कारगिल युद्धातील शहीद झालेले तालुक्यातील पहिले जवान कै. अशोक बिरंजे यांच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे. जास्तीत जास्त युवकांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष कुमार पाटील यांनी केले.