नेसरी : नेसरी येथे जिल्हा परिषदेच्या कुमार विद्या मंदिर, कन्या विद्या मंदिर, उर्दू विद्या मंदिर व कुमार विद्या मंदिर वस्तीशाळा सुंदरनगर येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक काळातील विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सरपंच गिरीजादेवी शिंदे यांनी स्वखर्चातून शालोपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवून त्यांना प्रोत्साहन दिले. जिल्हा परिषदेच्या या शाळांना ग्रामपंचायतीकडून सर्वतोपरी सहकार्य व जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देत शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच शिंदे यांनी सांगितले. यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन कमिटी, पालक उपस्थित होते.