चंदगडकरांनी सामाजिक अलोखा राखण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन

KolhapurLive

चंदगड : चंदगडकरांनी कायमच सामाजिक सलोखा राखावा, असे आवाहन चंदगडच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राची काणेकर यांनी केले. नगरपंचयातीच्या सभागृहामध्ये नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली व चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत चंदगड शहरामध्ये सामाजिक आलोखा राखण्यासाठी व गावामध्ये शांतता व सामाजिक अलोखा राखण्यासाठी बैठका आयोजित करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी नगराध्यक्षा,उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला व सर्व सेवकांना चंदगड गावामध्ये शांतता राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आव्हान केले. तसेच आपल्या परिचर्यातील सर्वांना कोणतीही चुकीच्या गोष्टीमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन करण्यात यावे, असे सांगितले नगराध्यक्ष प्राची कानेकर यांनी गावामध्ये एकोपा व शांतता कायम ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला नगरसेविका नेत्रदीप कांबळ, अनुसया दाणी, अनिता परीट, माधुरी कुंभार ,शिवनंदा कुंभारवाडी उपस्थित होते.