गडहिंग्लज : संकटाला न जुमानता रुग्णसेवेचा वसा निष्ठेने चालवणारे डॉक्टर्स व देशाच्या अर्थव्यवस्थातील एक महत्वाचे घटक म्हणून मोलाचे योगदान देणाऱ्या चार्टर्ड अकौंटंट यांना 'डॉक्टर्स डे' व 'चार्टर्ड अकौंटंट डे' निमित्त आजरा, गडहिंग्लज, चंदगड, नेसरी, कोल्हापूर, जयसिंगपूर, बेळगांव, निपाणी, कुडाळ, सांगली, पुणे शहर व परिसरातील डॉक्टर्स व चार्टर्ड अकौंटंट यांना 'श्री रवळनाथ व ज्ञानदीप प्रबोधिनी' परिवारातर्फे शुभेच्छा देवून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
'रवळनाथ' चे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनानुसार व संचालक, शाखा चेअरमन, सल्लागार यांच्या सहकाऱ्याने संस्थेच्या महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यातील संस्थेच्या कार्यक्षेत्रात हा उपक्रम राबविण्यात आला.
'रवळनाथाच्या गडहिंग्लज शाखेचे माजी शाखा चेअरमन प्रा. जे. बी. केसरकर, व्यवस्थापक श्री. शिवानंद घुगरे, मुख्य लेखापाल श्री. एकनाथ केसरकर, बोर्ड सेक्रेटरी श्री. सागर माने, वसुली अधिकारी श्री. सुनिलदत्त जाधव, शाखाधिकारी श्री. गोविंद जोशी, श्री. सुशांत जिजगोंडा, श्री, बसवराज चौगुले, श्री. किरण कोडोळी, श्री. दिपक शिंदे, श्री. पंकज कुंभार, श्री. किरण शहा, श्री. मल्लिकार्जुन पाटील, श्री. विक्रम जांभेकर, श्री. श्रेयस गाडवे, श्री. अशोक सुळकुडे, लेखापाल श्री. कृष्णात पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी संस्था कार्यक्षेत्र परिसरातील सर्व लहान- मोठ्या रुग्णालयात समक्ष भेटून सर्व डॉक्टर्सना आणि चार्टर्ड अकौंटंट यांना शुभेच्छापत्र, गुलाबपुष्प देवून कृतज्ञता व्यक्त केली.