गडहिंग्लज : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू असून कौशल्यावर आधारित शिक्षण प्रणाली राबविण्यात येत आहे. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी हिताचा विचार प्रामुख्याने करण्यात आला आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि आपले करिअर घडवावे. बदलत्या काळानुसार नवीन शैक्षणिक धोरण हे व्यक्ती विकासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यामुळे भारतीयांचा सर्वच क्षेत्रामध्ये दबदबा निर्माण होऊन भारत वैश्विक नेतृत्व करण्यास सज्ज होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण समजून घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे आवश्यक आहे असे प्रतिपादन संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालयात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजऱ्या होणाऱ्या 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह'च्या उद्घाटनप्रसंगी डॉ.कुराडे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम. कदम होते. ग्रंथपाल श्री संदीप कुराडे यांनी स्वागत करून प्रास्ताविकातून या उपक्रमशील कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.
अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारून आपला भारत हा 'नॉलेज हब' व्हावा तसेच ज्ञानामध्ये आपला देश जगात 'सुप्रीम पॉवर' ठरावा हा मुख्य उद्देश ठेऊन हे धोरण राबविण्यात येत आहे. यातून विद्यार्थी हा कौशल्याने परिपूर्ण व्हावा यासाठी हे धोरण राबविले जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी हा नवीन शैक्षणिक धोरणाची संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. हे धोरण विद्यार्थीभिमुख असे धोरण आहे. यातून विद्यार्थ्यांच्या कौशल्याला प्राधान्य देण्यात आले आहे. यातून विद्यार्थी व गुरुचे नाते अधिक घट्ट होणार आहे. यातून भारतीय शिक्षण अधिक गतिमान व्हावे यासाठी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अधिक महत्त्वाचे आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून हे धोरण विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमशील व कौशल्यपूर्ण असे शैक्षणिक धोरण विद्यार्थिनी आपल्याला प्रगतीसाठी स्वीकारणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हे धोरण विद्यार्थी हिताला व त्यांच्यातील कौशल्याला कशाप्रकारे बळ देते शिवाय विद्यार्थी हित कसे जपले जाते याबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमात प्रा. दत्तू जाधव यांनी 'अॅकॅडमीक अर्कोट क्रेडिट्स' याबाबत मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी डीजी लॉकर अॅपच्या माध्यमातून बारा अ ए.सी.सी. अकोट कसे उपडणे आवश्यक आहे. त्याचा लाभ विद्यार्थीना कसा होतो. विद्यार्थ्यांसाठी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आवश्यक ए.बी.सी. सिस्टिमची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. डी. सावंत यांनी 'कौशल्य विकास' या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी कौशल्य विकासाचा होणे गरजेचे आहे. हे कौशल्य सर्व विद्यार्थ्यांनी आत्मसात करून आपल्या पदवी व पदव्युत्तर शिक्षणाला बळ प्राप्त करून घेणे हे विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या स्कील डेव्हलपमेंटसाठी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्वयम, दिक्षा, स्वयंप्रभा यासारखे डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहे. याव्दारे ऑनलाईन कोर्सेस विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत याचा लाभ घ्यावा असे आवाहन करून त्यांनी विद्यार्थ्यांना कौशल्यज्ञान विकसित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास हिंदी विभाग प्रमुख डॉ. एन. बी. ईकिले, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. आर. कोल्हापुरे, रसायनश विभाग प्रमुख डॉ. ए. एम. हसुरे, मराठी विभाग प्रमुख डॉ. एम. व्ही राजे यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक मोरमारे यांनी केले.
प्रारंभी या कार्यक्रमाचे उद्घाटन कुंडीतील रोपाला पाणी घालून करण्यात आले. दि. २४ ते २९ जुलै या कालावधीत होणाऱ्या या सप्ताहात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे यामुळे व्याख्यान, निबंध स्पर्धा, ग्रुप डिस्कशन, पोस्टर प्रदर्शन, ऑनलाईन क्वीझ, रिल स्पर्धा इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहे.