नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्याच्या विकासाला प्राधान्यदेणारे आहे

KolhapurLive


गडहिंग्लज : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विदयार्थ्याच्या हिताचे आणि विद्यार्थ्याच्या विकासाला प्राधान्य देणारे आहे असे प्रतिपादन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी व्यक्त केले. येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सप्ताहाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कुराडे पुढे म्हणाले - आजच्या बदलत्या परिस्थिती चा विचार करून विद्यार्थ्यांनी सतत अपडेट राहण्यासाठी हे शैक्षणिक धोरण गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन आपले करिअर समृद्ध करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण जग है नॉलेजच्या दृष्टीने सक्षम करण्याकडे झेपावले आहे. आपला भारतीय विद्यार्थीही जगाच्या स्पर्धेत टिकला पाहिजे या दृष्टीने नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्याच्या कौशल्याचा विकास प्रामुख्याने करण्यात आला आहे. यासाठी सर्वानी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून आपल्या देशाच्या सर्वांगीण विकास साधून आपला देश वैश्विक नेतृत्व करण्यास सक्षम होईल असे डॉ. अनिल कुराडे यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये विद्यार्थ्यांना विविध कोर्सेस शिकण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे याचा लाभ विद्यार्थ्यानी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदाविण्यासाठी है डिजिटल प्लॅटफॉर्म महत्वाचे आहे. याद्वारे विद्यार्थ्यांच्या कौशल्य गुणांचा विकास साधला जाणार आहे. त्यामुळे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे अत्यंत महत्वाचे असल्याचे प्राचार्य डॉ. कदम यांनी स्पष्ट केले. या सप्ताहात राबविलेल्या या उपक्रमाबाबत श्रीधर माळगी, पौर्णिमा कुंभार, ऋतुजा कानडे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. एम. हसूरे, आय. क्यू. ए. सी. विभागाचे समन्वयक प्रा. किशोर अदाटे. डॉ. जी. जी. गायकवाड यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या सांगता समारोपाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक मोरमारे यांनी केले तर आभार ग्रंथपाल श्री संदीप कुराडे यांनी मानले.