दि 22/06/28 रोजी अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी आणि एटी फाऊंडेशन तर्फे न्यू इंग्लिश स्कूल मुगळी येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. शारीरिक व मानसिक समतोल राखण्यासाठी योगा हे एक उत्तम साधन आहे आणि यामुळे फुटबॉल खेळाडूंना अधिकाधिक फायदे होतात.
भरघोस उत्साहात पार पडलेल्या या प्रोग्रॅममध्ये तब्बल १२० मुलामुलींनी सहभाग नोंदविला. यावेळी मुला-मुलींना गडहिंग्लज मधील राष्ट्रीय योगापटू कु.अक्षता भाईगडे आणि वैष्णवी यादव यांच्याकडून योगाचे धडे देत महत्व समजावून सांगण्यात आले. तसेच त्यांनी योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली आणि मुला- मुलींकडून करून घेतली.
माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू, अकॅडमी आणि फाऊंडेशनच्या संस्थापिका तसेच ज्यांनी स्वत: योगाला त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनवलेला आहे, कु.अंजू तुरंबेकर यांनी आपल्या भागामध्ये चांगले फुटबॉल खेळाडू बनण्यासाठी अकॅडमी आणि फाऊंडेशन तर्फे असेच विविध प्रोग्रॅम साजरे करण्याची ग्वाही दिली आहे. तसेच न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्यध्यापिका सौ. आर. ए पाटील यांनी अकॅडमी आणि फाऊंडेशन तर्फे सतत राबविण्यात आलेल्या प्रोग्रॅममुळे मुला-मुलींना प्रोसाहन मिळत असल्याचे सांगितले आणि आनंद व्यक्त केला.
सदर प्रोग्रॅम अंजू तुरंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी अकॅडमीच्या हेड कोच भक्ती पवार, कोच अल्तमश खान, आकांक्षा माळगी, सोनम महाडिक, अश्विनी तुरंबेकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आर. ए. पाटील, क्रीडाशिक्षक प्रशांत महाजन आणि सर्व शिक्षक वर्ग यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले.