शिवराज महाविद्यालयाच्या एम.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी), बी.कॉम. (गणित) हे अभ्यासक्रम सुरु

KolhapurLive


गडहिंग्लज :

येथील कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था संचलित शिवराज महाविद्यालयामध्ये १२ नवीन तुकड्या सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. यामध्ये बी.कॉम. (गणित) एम.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी) असे दोन नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर बी.सी.ए., बी.सी.एस., बी.कॉम. इंग्रजी माध्यम अशा ११ नवीन तुकड्यांना एकाचवेळी परवानगी मिळालेले शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातील एकाचवेळी सर्वाधिक तुकड्यांना मान्यता मिळालेले शिवराज महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय उरलेले आहे. या भागातील विद्याथ्यांची गरज ओळखून महाविद्यालयात या नवीन तुकडयांना मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे.

सध्या या विद्या संकुलामध्ये के.जी. टू. पी. जी. असे शंभरहून अधिक वर्ग सुरु असून त्यामध्ये आठ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी या संख्येमध्ये भर पडत चाललेली आहे. त्यामुळे या संस्थेची स्वायत्त विद्यापीठाच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात होत आहे. सीमाभागातील शिक्षण सेवकांनी ५० वर्षांपूर्वी एकत्र येऊन चालविलेल्या या महाविद्यालयामध्ये अनेक नवनवीन उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात येत आहेत. याची दाखल घेऊन राष्ट्रीय पातळीवर नुकत्याच झालेल्या तपासणीमध्ये या महाविद्यालयाला 'ए' ग्रेड मानांकन मिळाले आहे. या शिक्षण संस्थेमुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील सीमाभागातील लाखो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पदव्या प्राप्त केलेल्या असून हजारो विद्यार्थ्यांनी परदेशातही नोकऱ्या मिळविलेल्या आहेत. अडीचशेहून अधिक संख्येने असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यासाठी सतत कार्यरत आहेत. एकेकाळी या महाविद्यालयामध्ये शिक्षण सेवक असलेले शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष आ.वाय.बारदेस्कर, श्री के.जी. पाटील, अॅड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, फार्मसीचे प्राचार्य डॉ. राहुल आधव, विना-अनुदानित विभागाचे अॅकेडेमिक डायरेक्टर डॉ. आर. एस. निळपणकर, शिवराज इंग्लिश मेडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. गौरी शिंदे मॅडम, स्कूलचे प्रशासकीय प्रमुख श्री ए.बी. पाटील, ज्युनिअरचे पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, रजिस्ट्रार डॉ. संतोष शहापूरकर, गोविंदराव माळी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री संजय भादूगरे आणि अशा सर्व शिक्षण सेवकांनी ध्येयवादाने प्रेरित होऊन आपले कर्तव्य बजावलेले आहे. त्यामुळेच या महाविद्यालयाची घोडदौड प्रगतीच्या दिशेने चाललेली आहे.