चंदगड : आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीची तयारी भाजपकडून सुरू करण्यात आली असून चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी शिवाजी पाटील यांची निवड केल्याचे नुकताच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्यावर शिवाजी पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मतदारसंघात नवा चेहरा असतानाही त्यांनी घेतलेल्या मतांचा विचार करता पराभवाने खचून न जाता चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजप रुजविण्यासाठी जनतेचे विविध प्रश्न घेऊन धडपड सुरू ठेवली आहे. यालाच भाजपाने प्राधान्य देत शिवाजी पाटील यांची चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुखपदी निवड केली असल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.