गडहिंग्लज :
येथील शिवराज महाविद्यालयाच्या केमिस्ट्री विभागाच्या एम. एस्सी. व बी.एस्सी. च्या २२ विद्यार्थ्यांची मुंबई व पुणे, गोवा, हैद्राबाद व बेंगलोर येथील नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असून या निवडीबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. शिवराज महाविद्यालय व फार्मासिटीकल अँड केमिकल अॅनालिटीकल ट्रेनिंग इन्स्टीटयूट गडहिंग्लज यांच्या सामंजस्य करार करण्यात आला आहे. सदर विद्यार्थ्यांची प्लेसमेंट त्याअंतर्गत झाली आहे.
समीर मारुती खोत, सुशांत पांडुरंग भोसले (एम.एस्सी), ओमकार शांताराम मुदाळकर, नारायण जनक गावडे, सुशांत राकेश मोरे, अभिजित अमृत किल्लेदार (बी.एस्सी) Enzene Bioscience Ltd. Pune, प्रवीण अरुण कोठावळे, विशाल बाबुराव जाधव, आकाश अशोक कांबळे, ओमकार बाजीराव चव्हाण (बी.एस्सी) Serum Institute. Pune, अजय अशोक चौगुले (एम.एस्सी)- Q.C, Gandharve Oil, Mumbai, सिद्धेश दत्तात्रय ढोनुक्षे, सुरज राजाराम पाटील (बी.एस्सी) Arari Drugs Mumbai, प्रशांत अनिल सारवणकर, स्वप्नील भागोजी मुंगूरवाडे (बी.एस्सी) Ampenol Ltd Pune, शिवानी संजय पाटील (बी.एस्सी) Sai Clinical Research Mumbai, ऋषिकेश पुंडलिक सुतार (बी.एस्सी) Indoco Remidies. Goa, शिवप्रताप मनोहर देसाई (बी.एस्सी) Madhura pharma, Bangalore, शुभम विष्णू कुरुणकर (बी.एस्सी) Lupin Pharma Pune, शुभम सदाशिव कपाडे, श्रीनाथ गजानन पाटील (एम.एस्सी) Lupin Pharma Goa, सुप्रिया सुरेश सोलापुरे (एम.एस्सी) Hetero Laboratory Hyderabad आदी विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांचे प्रोत्साहन व केमिस्ट्री विभाग प्रमुख डॉ. ए. एम. हसुरे, फार्मासिटीकल अँड केमिकल अॅनालिटीकल ट्रेनिंग इन्स्टीटयूटचे प्रमुख श्री रुपेश पाटील व केमिस्ट्री विभागाच्या सर्व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.