गडहिंग्लज : वाराणसी येथे पार पडलेल्या तिसऱ्या 'खेलो इंडिया' आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत ग्रीको रोमन क्रीडाप्रकारात १३० किलो वजनगटामध्ये येथील शिवराज महाविद्यालयाचा कुस्तीपटू शुभम चंद्रकांत सिदनाळे याने 'ब्राँझ' पदक पटकाविले. तर दिल्ली येथे पार पडलेल्या 'खेलो इंडिया स्पर्धेत ५० मीटर बॅकस्ट्रोक स्विमिंग मध्ये गौरव विठोबा चव्हाण या खेळाडूने 'ब्राँझ' पदक पटकाविले. या यशस्वी खेळाडूंचे महाविद्यालयाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांचे प्रोत्साहन व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. राहुल मगदूम, प्रा. जयवंत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.