गडहिंग्लज : येथील शिवाजी चौक मित्र मंडळाच्यावतीने महाराष्ट्र बेंदरानिमित्त ४ जुलै रोजी सुदृढ बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग ११ वर्षे या स्पर्धेचे नियोजन होत असून बिनदाती गट, दोन दाती गट, चार, सहा दाती, बैल गट अशा चार गटात होणाऱ्या स्पर्धेत नोंदणी २ जुलैपर्यंत करावी लागणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण २ लाखाचे बक्षिस आणि निशानी देवून गौरवण्यात येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भैसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी काशिनाथ देवगोंडा, भाउसो पाटील, संजय गुरव, रमेश पाटील, दत्ता चव्हाण, मोहन भैसकर, राणा चव्हाण, भैरू डोमणे, काशिनाथ बेळगुद्री, अरविंद पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते. आभार सचिव शिवाजी रेडेकर यांनी मानले..