एस. टी चालकास मारहाणप्रकरणी सात जणांना न्यायालयीन कोठडी

KolhapurLive

आजरा : भरधाव वेगाने जाणारी कार एसटी बसला घासल्याने कारमधील सात जणांनी एसटी चालक रवींद्र मगदूम (रा. पिंपळगाव, ता. भुदरगड) यांना मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सात जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना १९ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार आजरा सूतगिरणीजवळ घडला. याप्रकरणी रोशन राऊत, अजिंक्य भिकोटे, प्रवीण गीत, अजित भोईर, राहुल राऊत, किशोर भोईर, मिलिंद पांगत (सर्व रा. मोहपाडा, रसायनी ता. खालापूर, जि. रायगड) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. संशयितांच्या मारहाणीत एसटी चालक रवींद्र मगदूम जखमी झाले.