“हाच तो पाटला-पाटलांतला फरक”, ईडी चौकशीवरून ठाकरे गटाचा हल्लाबोल; समीर वानखेडे प्रकरणातही गंभीर आरोप

KolhapurLive

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची ईडी चौकशी झाली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतरही जयंत पाटलांचा चेहरा हसतमुख होता. यावरून ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तसंच, शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला ‘कॉर्डिलिया’ क्रूझ प्रकरणात ‘ड्रग्ज’ बाळगल्याच्या आरोपावरून अटक केली. समीर वानखेडे यांनी हे प्रकरण हाताळले होते. परंतु, आता याच प्रकरणावरून समीर वानखेडे सीबीआयच्या जाळ्यात अडकले आहेत. यावरून ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या  करण्यात आले आहेत.

सभ्यता गुंडाळून ठेवली

“कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीला अधिक माहिती हवी आहे व त्यासाठी जयंत पाटील यांना पाचारण केले. ही माहिती ते लेखी स्वरूपातही मागवू शकले असते, पण एकदा त्रास द्यायचा म्हटलं की, सभ्यता गुंडाळून ठेवली जाते. ज्या प्रकरणात जयंतरावांना बोलावले तो काय प्रकार आहे? पण ‘घोटाळा घोटाळा’ म्हणून भुई बडवली जात आहे. या कथित घोटाळ्यांशी संबंधित राजकारणी भाजप परिवारातही असू शकतील, पण त्यांना चौकशीसाठी अशी बोलावणी केली जात नाहीत. तो मान फक्त भाजपपुढे न झुकणाऱ्या विरोधकांचा”, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

शिवसेनेचे 40 आमदार उंदरासारखे पळाले

“जयंत पाटील दुपारी बारा वाजता ईडी कार्यालयात गेले व रात्री साधारण दहा वाजता बाहेर पडले. ते हसतमुख होते व त्या रात्री त्यांना सुखाने झोप लागली असेल. निर्भय माणसेही शांत झोपतात. हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत व त्यांनी मध्यंतरी जाहीर केले होते की, ”मला आता शांत सुखाने झोप लागते. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सवाल्यांची भीती आता अजिबात नाही. कारण मी दाराला भाजपचे कडीकोयंडे लावले आहेत!” सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील यांनासुद्धा सुखाने झोप लागत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहेच. काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्याने त्यांच्यावरील ईडी वगैरेंचे बालंट टळले आहे. शिवसेनेचे 40 आमदार ईडी, सीबीआयच्या भयाने उंदरासारखे पळाले. त्यापैकी अनेकांवर चौकश्यांचे समन्स व अटकेचे वॉरंट होते. पक्षांतर करताच भाजपने त्यांना ईडीपासून अभय दिले, पण जे भाजपच्या कुटील कारस्थानाला बळी पडले नाहीत असे छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांसारखे नेते ईडी कारवाईचे बळी ठरले.

भाजपामध्ये येण्याकरता जयंत पाटलांवर दबाव