पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचे फलित; ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई होणार, दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय करार

KolhapurLive

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेशी दौऱ्यावर आहेत. जपानमध्ये जी ७ परिषदेला हजेरी लावल्यानंतर त्यांनी सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियातील महत्त्वाच्या उद्योजकांची भेट घेतली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि मोदी यांचीही यावेळी भेट झाली. या दोघांमध्ये व्यापक चर्चा झाली असून व्यापार आणि गुंतवणुकीसह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याकरता या बैठकीत भर देण्यात आला. तसंच, ऑस्ट्रेलियात मंदिरांवर होत असलेल्या हल्ल्यांवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे दिले आहे.
व्यापक चर्चा झाल्यानंतर दोघांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मोदी म्हणाले की, “खाण आणि खनिजांच्या क्षेत्रात धोरणात्मक सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली आहे. दोन्ही देशांनी ग्रीन हायड्रोजनसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.” ते पुढे म्हणाले की, “गेल्या वर्षभरातील ही आमची सहावी बैठक आहे. या बैठका आमच्या मैत्रीतील परिपक्वता दर्शवतात. क्रिकेटच्या भाषेत आमच्यातील नाते टी २० सारखे झाले आहे”, असंही मोदींनी पुढे नमूद केलं.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा केली. “भारत आणि ऑस्ट्रेलियातील मैत्रीपूर्ण संबंधांना ठेच पोहोचेल अशी कृत्ये आम्ही स्वीकारणार नाही, असं धोरण ऑस्ट्रेलियाने स्वीकारले आहे. तसंच, पंतप्रधान अल्बानीज यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की भविष्यातही अशा घटकांविरोधात कठोर कारवाई केली जाईल”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

द्वीपक्षाय बैठक सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीयांना सिडनी येथे अॅडमिरल्टी हाऊसमध्ये औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.“गेल्यावर्षी भारत-ऑस्ट्रेलिया इकॉनॉमिक कॉर्पोरेशन आणि व्यापार करार अंमलात आणला होता. आज आम्ही सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करारावर लक्ष केंद्रित करण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन्ही देशांतील सहकार्याचे नवे मार्ग खुले होती”, असं या संयुक्त प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तर, पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि सर्व ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांना क्रिकेट विश्वचषकासाठी भारतात आमंत्रित करण्यात आले आहे. ते भारतात आल्यानंतर भारतात भव्य दिवाळी साजरी केली जाईल, असं आश्वासन नरेंद्र मोदींनी दिलं.
दरम्यान, यावेळी बंगळुरूतील नवीन ऑस्ट्रेलियन कौन्सुलेट जनरलच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. यामुळे भारतातील ऑस्ट्रेलियन डिजिटल आणि इनोव्हेशन इकोसिस्टमशी जोडण्यास मदत होणार आहे. तसंच, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संबंधाचा फायदा ग्लोबल साऊथच्या प्रगतीसाठीही होईल, अशी आशा मोदींनी व्यक्त केली.दरम्यान, यावेळी बंगळुरूतील नवीन ऑस्ट्रेलियन कौन्सुलेट जनरलच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. यामुळे भारतातील ऑस्ट्रेलियन डिजिटल आणि इनोव्हेशन इकोसिस्टमशी जोडण्यास मदत होणार आहे. तसंच, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संबंधाचा फायदा ग्लोबल साऊथच्या प्रगतीसाठीही होईल, अशी आशा मोदींनी व्यक्त केली.