येथील राजा शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या फंड व शेअर मार्केट या विषयावरील भित्तीपत्रिकेचे अनावरण प्राचार्य डॉ. निवास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
या भित्तिपत्रिकेत शेअर बाजाराचे स्वरूप व वैशिष्ट्ये तसेच त्यांचे फायदे-तोटे, याचबरोबर गुंतवणूक व त्यामधील सुरक्षितता या विषयावर माहिती दिली आहे. भित्तीपत्रिकेत उपयुक्त माहिती आहे. यामध्ये अक्षता भोसले, दत्ता निकम, संकेत पंडित व अश्विनी रेडेकर यांनी सहभाग घेतला. प्रा. किशोर पाटील यांनी सहकार्य केले. आभार प्रा. वैशाली पाटील यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष बाळासाहेब कुपेकर यांची प्रेरणा, तर सचिव बी. ए. पाटील यांचे सहकार्य लाभले.