मुंबईसाठी रोहित शर्माने (२), ईशान किशन (१३), कॅमरून ग्रीन (३३), तिलक वर्मा (२), सूर्यकुमार यादव (२३), टीम डेविड (0), पीयुष चावलाने १८ धावा केल्या. गुजरातच्या नूर अहमदने चार षटकात ३७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसंच राशीद खानने चार षटकात २७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला बाद केलं. मुंबईच्या नेहल वढेरा २१ चेंडूत ४० धावांवर बाद झाला. अर्जुन तेंडुलकर १३ धावा करून तंबूत परतला.
गुजरातच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शुबमन गिलने अप्रतिम फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली. मुंबईच्या कुमरच्या गोलंदाजीवर शुबमन ५६ धावांवर बाद झाल्यानंतर अभिनव मनोहरने धडाकेबाज फलंदाजी केली. अभिनव २० चेंडूत ४२ धावा करून रिलेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. मात्र, डेविड मिलरने आक्रमक फलंदाजी करून धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. डेविड मिलरने २२ चेंडूत ४६ धावा कुटल्या. तर राहुल तेवतियाने ५ चेंडूत २० धावांची खेळी साकारली.या धावांच्या जोरावर गुजरात टायटन्सने २० षटकात ६ विकेट्स गमावत २०७ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला विजयासाठी २०८ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार होतं.