गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालय आणि नेहरू युवा केंद्र यांच्या विद्यमाने पर्यावरण सर्वर्धनासाठी रांगोळी आणि वक्रत्व स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी स्वागत व प्रस्ताविक प्रा. सुषमा पाटील यांनी केले. कार्यक्रमास सचिव डॉ. अनिल कुराडे प्राचार्य डॉ. एस. एम .कदम व प्रा. बिनादेवी कुराडे यांचे प्रमुख उपस्थिती होती तर स्पर्धेतील अनुक्रमे विजेते असे : वकृत्व स्पर्धा - अमृता सागर, शुभम मेंगाने, संजना शिंदे, तर रांगोळी स्पर्धा- कोमल कुंभार निकिता पाटील हिला मंडळ या सर्वांच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून रमण लोहार, वैष्णवी भलावणकर, यांनी काम पाहिले. वक्रत्व स्पर्धेचे परीक्षण प्रा. अशोक मोरमारे व वैष्णवी भलावणकर यांनी केली कार्यक्रमाचे संयोजक प्रा. एम. आर. दंडगे, प्रा. दीपिका खांडेकर -पंडित, प्रा. सुषमा पाटील प्रा. प्रज्ञा कुराडे प्रा. अस्मिता अरभावी, प्राध्यापक व्ही.पी.कळसगोडा, प्रा. पूजा काळंगे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक श्रुती पाटील यांनी केले, तर आभार प्राध्यापक पूजा काळगे यांनी मानले.