नेसरीला डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

KolhapurLive


नेसरी : जयभीम समाज नेसरी यांचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन दि. १२ ते १४ एप्रिलपर्यंत केले आहे. बुधवार दि. १२ एप्रिल रोजी खुल्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा होणार आहेत. यामध्ये लहान गट - ५ वी ते १० वी - यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर-जीवन व कार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात रमाबाईंचे स्थान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म का स्वीकारला ? हे विषय आहेत. यासाठी अनुक्रमे ३ हजार १ रु., २ हजार १ रु, १ हजार ५०१ रुपये व चषक देण्यात येणार आहे. खुला गटासाठी विषय नुकसान कोणी कोणाचे केले - आम्ही संविधानाचे की संविधानाने आमचे, डॉ. बाबासाहेब आंबेकडर यांची जलनीती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक आकलन, युद्ध नको बुद्ध हवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्थनीती व सध्याचे आर्थिक धोरण हे आहेत. यासाठी अनुक्रमे ७ हजार १ रु. ५ हजार १ रु., ३ हजार रुपये व चषक असे आहे. दि. १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजत  खुल्या मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या असून यासाठी अनुक्रमे ५ हजार १ रु. ३ हजार १ रु., २ हजार १ रु. १ हजार १ रु. व चषक देण्यात येणार आहे. दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ध्वजारोहन, फोटो पूजन , बुद्ध वंदना, त्यानंतर नितीन चंदनशिवे यांचे व्याख्यान, सकाळी चार 
वाजता डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विश्वास कांबळे, शैलेश कांबळे, सुनिल कांबळे यांच्याशी संपर्क साधावा, तसेच कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन जयभीम समाज यांच्यावतीने केले आहे.