शिवराज महाविद्यालयात नॅक मूल्यांकन समितीचे भेट

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयास  'नॅक' मूल्यांकन समितीने भेट दिली. समितीचे प्रमुख प्रा. राकेशकुमार शर्मा, समन्वयक प्रा. परमजीत कौर-धिंडसा, सदस्य डॉ. धनुकुमार अंगडी  यांनी भेट दिली. या टीमचे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी स्वागत केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, संस्थेचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष जे . वाय . बारदेस्कर, ॲड.  दिग्विजय कुराडे, के.जी.पेडणेकर, श्री नंदनवाडे, प्रा. किशोर अदाटे आदी.सदस्य उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. एस . एम. कदम यांच्यासह महाविद्यालयातील विविध विभागाच्यावतीने पेपर प्रेझेन्टेशन सादर केले . त्यानंतर माजी विद्यार्थींबरोबर कमिटीने संवाद साधला. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक   डॉ. राजन गवस, सहाय्यक पोलीस निरीक्षक भानुदास खटावकर , संशोधक भगवान पाटील, 'गोडसाखर'चे माजी कार्यकारी संचालक  विश्वास देसाई, जि. प. सदस्य  ॲड. हेमंत कोलेकर, प्रकाश पत्ताडे, गोडसाखरचे व्हा. चेअरमन प्रकाश चव्हाण, संघटना सचिव बसवराज आजरी, विजयमाला घोलपे, ॲड. सतीश ईटी, डॉ. नागेश पट्टणशेट्टी, नंदकुमार शेळके आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी नॅकच्या टीमने महाविद्यालयातील संगणक विभाग, ग्रंथालय, क्रीडा व एनसीसी विभाग, प्रशासन विभाग तसेच अन्य विभागांना भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर नॅक मूल्यांकन समितीच्या वतीने प्राचार्य डॉ. एस. एम. कदम आणि सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला. यावेळी प्रशासकीय प्रमुख डॉ. संतोष शहापूरकर, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. प्रा. एन. बी. ईकिले यांनी सूत्रसंचालन केले.