गडहिंग्लज :येथील काळभैरी रोडवरील मारुती मंदिर शेजारी असलेला हजरत पीर बंगाल शहावली बाबांचा उरूस उद्यापासून (ता.14) सुरू होत आहे.१७ पर्यंत हा उरूस चालणार असून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. उद्या संध्याकाळी पाचला आरिफ हावळे यांच्या घरातून मंडपमान, बुधवारी (ता. 15) सायंकाळी सातला आनंद बिलावर यांच्या घरातून सदल, गलेफ व निशाण मिरवणूक निघणार आहे गुरुवारी तारीख 16 बाबांचा उरूस होणार असून त्या दिवशी नैवेद्याचा कार्यक्रम होईल.शुक्रवारी (ता 17) आमिरअली मुजावर यांच्या घरातून गलेफ मिरवणुकीनंतर उरुसाची सांगता होणार आहे. उरूस कमिटीचे पदअधिकारी व सदस्यांनी नियोजन केले आहे.