महागाव : संत गजानन फार्मसी कॉलेजमध्ये शेअरिंग ऑफ ह्यूमन रिसोर्स या उपक्रमाअंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये कोल्हापूरच्या भारती विद्यापीठचे प्रा. ए. एस. जाधव यांनी व आनंदी फार्मसी, कळेचे प्रा. आर.आर. शहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना मगदूम, प्रा. स्वाती कराडे यांनी तर आभार प्रा. कैवल्य मिरजकर, प्रा. सिदगोंडा करोशी यांनी मानले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस .जी. किल्लेदार, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.