संगणक प्रशिक्षण व कापडी शिवणकाम प्रशिक्षण प्रवेश घेण्याचे गडहिंग्लज नगरपरिषदचे आवाहन

KolhapurLive

गडहिंग्लज ,येथील नगरपरिषदेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना विभागातर्फे पालिका व सर्व्हर कॅम्प्युटर तर्फे कौशल्य प्रशिक्षण आयोजन केले आहे. कॉम्प्युटर हार्डवेअर व कापडी शिवणकाम या प्रशिक्षणासाठी इच्छुकानी दहा मार्च अखेर प्रवेश घेण्याचे आवाहन अधिकारी स्वरूप खारगे व सहाय्यक प्रकल्पाअधिकारी जयवंत वरपे यांनी केले आहे. या माध्यमातून अनुसूचित जाती,जमाती,महिला,दिव्यांग व अल्पसंख्याक प्रवर्गातील युवक व युवतींना शासनमान्य  मिळणार आहे. रोजगार व व्यवसायाची संधी उपलब्ध होईल. दहावी उत्तीर्ण, १८ वर्षे पूर्ण , शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका,  जातीचा दाखला, दिव्यांग प्रमाणपत्राचे झेरॉक्स प्रत अनिवार्य आहे. पालिकेतील दीनदयाळ अंत्योदय योजना विभाग व सर्व्हर कॉम्प्युटरची संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.