काय म्हणाले नितीन गडकरी?
“लोकांना सांगतो, तुम्हाला पटलं तर मतं द्या. नाहीतर देऊ नका. मी आता फार काही लोणी लावायला तयार नाही. कोणतरी नवीन येईल,” अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
“राजनीती म्हणजे लोकनिती, धर्मनीती…”
“राजकारण म्हणजे पैसा कमावण्याचा धंदा नाही. राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि धर्मकारण आहे. तर, राजनीती म्हणजे लोकनीती, धर्मनीती आहे. सामाजिक-आर्थिक परिवर्तन राजकारणातील उद्दिष्टे आहेत. त्यामुळे समाजाची विशेषत: गोरगरिबांची सेवा राजकारणातून होणं अपेक्षित आहे,” असंही नितीन गडकरांनी सांगितलं.
“मी प्रेमाने नाहीतर ठोकून…”
“जलसंवर्धन, वातावरणातील बदल आणि पडीक जमिनीचा योग्य वापर, या क्षेत्रात प्रयोग करण्यासाठी भरपूर वाव आहे. त्या क्षेत्रात जिद्दीने काम करत आहे. मी प्रेमाने नाहीतर ठोकून काम करतो. भविष्यातही याच क्षेत्रात जोमाने काम करणार. कारण, याने भारताची अर्थव्यवस्था नाहीतर ग्रामीण भागाचाही चेहरामोहरा बदलू शकतो,” असेही नितीन गडकरींनी म्हटलं.