गडहिंग्लज : जखेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील श्री जोतिर्लिंग देवालय वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना, कळसारोहण कार्यक्रम उद्या ( ता. २७) होणार आहे. सकाळी साडेनऊला किसन महाराज यांच्या हस्ते हे कार्यक्रम होतील. दुपारी अडीचनंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी सरपंच भीमराव राजाराम, अध्यक्ष अवधूत पाटील यांनी केले आहे.