ओंकार महाविद्यालयात आज अर्थसंकल्पनावर चर्चासत्र

KolhapurLive
 

    गडहिंग्लज : ओंकार महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पावर शनिवार दि. 11 फेब्रुवारी रोजी दुपारी चर्चासत्राचे आयोजन केले आहे . ओंकर  महाविद्यालय आणि सारथी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र होत आहे .या चर्चासत्रात ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. पी.एस. कांबळे यांचे मार्गदर्शन होणार आहे. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांची उपस्थिती राहणार आहे. याशिवाय नंदकुमार शेळके, ऑफ कॉमर्सचे कार्याध्यक्ष राजेश बोरगावे, सफर असोशिएशनचे दीपक वेर्णेकर ,संदीप कुलकर्णी यांची उपस्थिती राहणार आहे. या चर्चासत्राला उपस्थिती राहण्याचे आव्हान ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांनी केले आहे.