बीसीसीआयने बॉर्डर गावसकर ट्रॉफीबद्दल घेतला मोठा निर्णय; धर्मशाळा ऐवजी ‘या’ ठिकाणी होणार तिसरा सामना

KolhapurLive

    भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या वेळापत्रकात बदल जाहीर केला आहे. वेळापत्रकानुसार मालिकेतील तिसरा सामना धर्मशाला येथे खेळवला जाणार होता, मात्र आता हा सामना इंदूरला हलवण्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. मंडळाने सोमवारी सकाळी प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली. हा सामना १ ते ५ मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे.

बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, ”भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील तिसरी कसोटी, जी मूळत: १ ते ५ मार्च दरम्यान एचपीसीए स्टेडियम, धरमशाला येथे होणार होती, ती आता होळकर स्टेडियम, इंदूर येथे हलवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातील कडाक्याच्या हिवाळ्याच्या परिस्थितीमुळे, आउटफिल्डमध्ये पुरेशी गवत घनता नाही आणि पूर्णपणे विकसित होण्यासाठी थोडा वेळ लागेल.”
     
    भारत आणि ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेचे वेळापत्रक –
   दुसरी कसोटी – १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्लीत
तिसरी कसोटी – १ ते ५ मार्च, इंदूर
चौथी कसोटी – ९ ते १३ मार्च, अहमदाबाद
    मालिकेत भारत १-० ने आघाडीवर –
या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळला गेला, रोहित शर्मा अँड कंपनीने हा सामना एक डाव आणि १३२ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात १७७ आणि दुसऱ्या डावात ९१ धावांवर गारद झाला. भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात ४०० धावा केल्या आहेत.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाकडून मार्नस लाबुशेनने सर्वाधिक ४९ धावा केल्या होत्या. या डावात रवींद्र जडेजाने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर कांगारु संघाचा दुसऱ्या डावत आश्विनच्या फिरकीपुढे गडगडला. आश्विनने पाच फलंदाजांची शिकार केली.
दरम्यान भारतीय संघाकडून पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्माने दमदार शतक झळकावले. त्याने १२० धावांची शानदार खेळी केली. त्याचबरोबर अक्षर पटेलने ८४ आणि रवींद्र जडेजाने ७० धावांचे योगदान दिले आहे.
  
दरम्यान भारतीय संघाकडून पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्माने दमदार शतक झळकावले. त्याने १२० धावांची शानदार खेळी केली. त्याचबरोबर अक्षर पटेलने ८४ आणि रवींद्र जडेजाने ७० धावांचे योगदान दिले आहे.