रस्ता डांबरीकरणास निधीची मागणी

KolhapurLive


महागाव : येथील संत गजानन महाराज हॉस्पिटल समोरील रस्ता डांबरीकरण व खडीकरण, तसेच गटार बांधकाम करण्यासाठी नीधी उपलब्ध करून द्यावा. यासाठी संत गजानन महाराज हॉस्पिटलकडून चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांना निवेदन दिले. महागाव येथील  विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आमदारा पाटील येथे आले होते. यावेळी निवेदन दिले. संस्थेचे अध्यक्ष ॲड.आण्णासाहेब चव्हाण उपस्थित होते. डॉ. यशवंत चव्हाण, डॉ.संजय चव्हाण, ॲड. बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.