आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांची माहिती....
विशेष सहकार्याबद्दल पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे मानले आभार....
कागल, दि. ११:
कागल तालुक्यातील नव्याने दहा गावांमधील जलजीवन पाणीपुरवठा योजनांना पुरवणी मंजुरी मिळाली असल्याची माहिती, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. जॅकवेल, फिल्टर हाऊस, पाईपलाईन, वितरण व्यवस्था, सोलर सिस्टिम अशा कामांसाठी २० कोटींहून अधिक निधी मंजूर झाल्याचेही पत्रकात म्हटले आहे. या कामी विशेष सहकार्य मिळाल्याबद्दल राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आमदार श्री. मुश्रीफ यांनी आभार व्यक्त करून अभिनंदन केले आहे.
पुरवणी आराखड्यांतर्गत मंजूर झालेल्या गावांची निधीसह कामांची माहिती अशी......
मळगे खुर्द : एक कोटी, ३७ लाख. फिल्टर हाऊस, पाण्याची टाकी, इनटेक विहीर व वितरण व्यवस्था.
निढोरी: एक कोटी, ४० लाख. सोलर सिस्टीम, वितरण व्यवस्था, संप आणि पंप.
बामणी:दोन कोटी, दोन लाख. फिल्टर हाऊस, पाण्याची टाकी, पंप व वितरण व्यवस्था.
कुरणी: ५८ लाख. सोलर व वितरण व्यवस्था.
बोळावी: ८३ लाख. पंप, सोलर पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था व पाईपलाईन.
भडगाव: एक कोटी, ७९ लाख. दाबनलिका, पंप, संप, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था.
चिमगाव: एक कोटी, नऊ लाख. इनटेक विहीर, सोलर सिस्टिम व वितरण व्यवस्था.
बाचणी: चार कोटी. फिल्टर हाऊस, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था सोलर सिस्टिम व दाबनलिका.
बेलवळे बुद्रुक: एक कोटी, ९० लाख. पंप, सोलर सिस्टिम, फिल्टर हाऊस, पाण्याची टाकी व वितरण व्यवस्था.
खडकेवाडा: एक कोटी, ६६ लाख. पंप, दाबनलिका, फिल्टर हाऊस, पाण्याची टाकी, इनटेक विहीर संप व वितरण व्यवस्था.