आजरा : केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता आजरा येथे येणार आहेत.अण्णा भाऊ संस्कृतीक सभागृहामध्ये ते नवमतदारांशी थेट संवाद साधणार. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये त्यांच्याकडे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाची जबाबदारी आणि प्रभारी आहेत. त्या अनुषंगाने ते चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्याचा दौरा करणार आहेत. बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्रप्रमुखाशी संवाद साधणार आहेत. तालुक्यातील जास्तीत जास्त नवमतदारवर्गानी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहावे, तसेच पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आव्हान भाजप तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी केली.