सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. सध्या सीरीजमध्ये दोन्ही टीम्स 1-1 अशा बरोबरीत आहेत. आजचा सामना निर्णायक असेल. मॅच जिंकणारा संघ सीरीजही जिंकेल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने आपला शेवटचा T20 सामना मार्च 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता. यात भारताने विजय मिळवला होता. भारताने त्या मॅचमध्ये 224 धावा केल्या होत्या. आज तिसऱ्या टी 20 सामन्यात अहमदाबादच्या पीचवर धावांचा पाऊस पडेल. दुसऱ्याबाजूला सगळ्यांची नजर भारताच्या प्लेइंग 11 वर असेल. पृथ्वी शॉ आणि उमरान मलिक यांना प्लेइंग 11 मध्ये संधी मिळते का ? त्याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुक्ता आहे.
शुभमन गिल चालू टी 20 सीरीजमध्ये विशेष कमाल दाखवू शकलेला नाही. त्याच्याजागी पृथ्वी शॉ ला शेवटच्या टी 20 सामन्यात संधी मिळू शकते. इशान किशनचा परफॉर्मन्सही खास नाहीय. पण विकेटकीपर म्हणून त्याला संधी मिळू शकते. शुभमनच्या जागी पृथ्वी ला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते.
दुसऱ्या समीकरणानुसार, उमरान मलिकला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते. अर्शदीपला बाहेर बेंचवर बसाव लागेल. अर्शदीपने या सीरीजमध्ये खास परफॉर्मन्स केलेला नाही. टीम मॅनेजमेंट उमरानच्या स्पीडवर विश्वास ठेवू शकते. त्याला अखेरच्या टी 20 मध्ये संधी मिळू शकते. त्याशिवाय भारताच्या प्लेइंग 11 मध्ये फार बदल होण्याची शक्यता नाहीय.